Friday, August 2, 2019

ट्रॅफिक जॅम!

काही कारणास्तव आज विनाबॅग ऑफिसला गेलो होतो, त्यामुळे छत्रीही जवळ नव्हती. जाताना पाऊस नव्हता म्हणून काही अडचण आली नाही, पण ऑफिसमधून निघण्याच्या वेळी नेमका जोरदार पाऊस सुरू झाला आणि कधी नव्हे ते मला स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा करावी लागली. पण, दुर्दैव असं की ऑफिस ते स्टेशन हे अंतर जे मी नेहमी 'चालत' दहा मिनिटांत कापतो, तेच अंतर कापायला रिक्षाला तब्बल अर्धा तास लागला...
प्रचंड ट्रॅफिकमुळे रिक्षा पुढे सरकू शकत नव्हती आणि मुसळधार पावसामुळे मी रिक्षातून उतरू शकत नव्हतो. परिणामी, पाऊस नसता तर जी ट्रेन मी चालत जाऊन पकडू शकलो असतो ती रिक्षाने जाऊन सुद्धा मला मिळाली नाही...
*निष्कर्ष : वेळ गेला, पैसा गेला, ट्रेनही गेली, राहिला केवळ मनःस्ताप, तो घेऊन घरी चाललोय...*😒

No comments:

Post a Comment