कार्यतत्पर मध्य रेल्वे प्रशासन!
मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना आज रेल्वे प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा प्रत्यक्ष अनुभव आला.
आज दुपारची घटना. बदलापूरहून सीएसएमटीला जाणारी १२:२२ ची धीमी लोकल पकडून ऑफिसला जायला निघालो होतो. डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान काही लोकांनी एक जखमी युवक आमच्या डब्यात टाकला. त्याला कोणी मारून टाकले होते की तो लोकलमधून पडला होता की त्याला गाडीने धडक दिली होती हे समजायला काही मार्ग नव्हता. गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. प्रवाशांमध्ये खळबळ उडाली पण आता नेमके काय करायचे याबद्दल सर्वचजण अनभिज्ञ होते. माझ्यासह आणखी दोन-चार जणांनी डब्यातील साखळ्या खेचून लोकल थांबविण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तोपर्यंत गाडी दिवा स्थानकाजवळ पोहोचली आणि सिग्नल लागल्यामुळे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मच्या आधीच थांबली.
सदर तरुणाचा होणारा रक्तस्राव पाहता काळजी याची वाटत होती की लवकरात लवकर एखाद्या स्थानकावर या तरुणाला उतरवून त्याच्यावर उपचार झाले नाहीत तर त्याचा जीव जाईल. गाडी पुन्हा मध्येच थांबल्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली आणि आता याचे काही खरं नाही असे वाटून हताश होऊन पुन्हा माझ्या जागेवर बसलो, तेवढ्यात लक्षात आले की लोकलच्या डब्यांमध्ये रेल्वे सिक्युरिटी हेल्पलाईन क्रमांक लिहिलेला असतो! तात्काळ उठलो आणि तो क्रमांक मिळवून डायल केला. सुरुवातीला जरा शंकाच होती की फोन उचलला जाईल का? समोरून व्यवस्थित प्रतिसाद मिळेल का? तात्काळ काही कार्यवाही होईल का?
पण कॉल केल्यावर अगदी दोनच रिंगमध्ये फोन उचलला गेला. समोरून बोलणाऱ्या महिलेने जखमी तरुणाची, माझी, लोकलची आणि लोकलच्या लोकेशनची सविस्तर माहिती घेतली. आणि सांगितले की लगेच दिव्यात मदत मिळेल की नाही हे सांगता येणार नाही, ठाण्यापर्यंत जावे लागेल. मी तिला विनंती केली की तर ती म्हणाली की मी पूर्ण प्रयत्न करते आणि फोन ठेवला.
एव्हाना लोकल सुरू होऊन दिवा स्थानकात पोहोचतच होती. दिव्यात मदत मिळण्याची मी आशाच सोडली होती. पण आश्चर्य! गाडी दिवा स्थानकात थांबताच दोन माणसं स्ट्रेचर घेऊन धावतच आमच्या डब्याजवळ येत होते! त्यांनीदेखील क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्या तरुणाला स्ट्रेचरवर झोपवून नेलेसुद्धा...
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सरकारला, प्रशासनाला आपण सगळेच शिव्या घालत असतो. पण सरकारी नोकरी मिळवून केवळ खुर्च्या गरम न करता प्रामाणिकपणे आपलं काम करणारीही बरीच लोकं आहेत, ही जाणीव सुखावणारी असते.
मलाही ऑफिसला जायचे असल्यामुळे पुढचा फॉलोअप नाही घेऊ शकलो. त्या तरुणाला तात्काळ आवश्यक ते उपचार मिळाले असतील अशी आशा बाळगून मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो...🙏👍
#hatsoff #centralrailway